Saturday, May 23, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पुणे : गणपती उत्सवासाठी ध्वनीक्षेपक वापरासंदर्भात आदेशात दुरुस्ती

पुणे : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणीसंदर्भात सन २०२५ मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांच्या वापरासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात बदल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेश क्र. पगक/कावि/२५८/२०२५ दि. १८ ऑगस्ट २०२५ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

याअंतर्गत गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत पूर्वी १ सप्टेंबर २०२५ (सोमवार – सहावा दिवस) या दिवशी परवानगी दिली होती. मात्र नव्या दुरुस्तीप्रमाणे ही तारीख बदलून आता ५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार – दहावा दिवस) अशी करण्यात आली आहे.

हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हंडाधिकारी, पुणे जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News