Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे निर्णय : घुग्घुसला मिळणार अप्पर तहसील कार्यालय, पट्टे वाटपाला गती

मुंबई : मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर व घुग्घुस येथील पट्ट्यांचे सर्वेक्षण करून सहा महिन्यांत पट्टे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार रिक्त पदे त्वरित भरून कार्यवाही पूर्ण करणे, नझूल विभागासाठी तलाठी नियुक्त करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

घुग्घुस क्रीडांगणासाठी जागेची अडचण दूर करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याशिवाय घुग्घुससाठी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी मान्य करून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही मंत्री महोदयांनी दिले.

या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, सुभाष कासनगोट्टवार, जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी देवतळे, श्याम कनकम, दंडारे, ईदरीस, बाबुलकर व रवि गुरनुले आदी मान्यवर उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News