कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायलमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावरील Latest Jobs या पर्यायातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या योजनेअंतर्गत होम हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासाठी तब्बल 5 हजार नोकऱ्या उपलब्ध असून, पात्र उमेदवारांना दीड लाख रुपये मासिक वेतनाची संधी मिळणार आहे.
पात्रतेसाठी अटी पुढीलप्रमाणे :
- उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षे दरम्यान असावे.
- इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक.
- काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी भारतातील नियामक प्राधिकरण मान्यताप्राप्त किमान 990 तासांचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक.
- भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त मिडवायझरी, नर्सिंग, फिजिओथेरेपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण आवश्यक.
- जीडीए, एएनएम, जीएनएम, बी.एस्सी. नर्सिंग किंवा पोस्ट बी.एस्सी. नर्सिंग शैक्षणिक पात्रता आवश्यक.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.





