Tuesday, July 28, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

दारूभट्टी बंदीसाठी बीएसपीचे धरणे आंदोलन; महिलांमध्ये तीव्र संताप

घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील नागरिक विशेषतः अल्पवयीन मुले दारू व अन्य व्यसनांच्या आहारी जात असल्यामुळे घुग्घुस शहरात सामाजिक व नैतिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या सर्व परिस्थितीचा केंद्रबिंदू ठरत आहेत शहरातील दोन देशी दारूच्या भट्ट्या, ज्या नागरिकांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहेत.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता बहुजन समाज पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला यांच्या नेतृत्वाखाली येत्या 06 ऑगस्ट 2025 रोजी गांधी चौक येथे दुपारी 1 ते 4 या वेळेत भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

शहरातील आठवडी बाजाराच्या मध्यभागी, तसेच शिवमंदिराच्या जवळील तलावाच्या बाजूला देशी दारू भट्ट्या सुरू असून, त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांना दारुड्यांकडून कहीही मानला जात आहे.
विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील भट्टी ही कागदपत्रांत हेराफेरी करून लांब अंतर दाखवून बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली आहे.

तलावाजवळील भट्टीतून मागच्या वाटेने दारूचा पुरवठा केला जात असल्यामुळे शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला देखील दारुड्यांच्या वाईट नजरेला आणि वर्तनाला सामोऱ्या जात आहेत, तरीही या दोन्ही संस्थे तर्फे कुठला आक्षेप नाही, ही अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक बाब आहे.

समाजसेवकांचे प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या भट्ट्या बंद करण्यासाठी घुग्घुस नगर परिषद, एक्साइज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच घुग्घुस पोलीस ठाणे येथे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, प्रशासनाची कारवाई फक्त कागदापुरती मर्यादित राहिलेली असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झालेली नाही, ही बाब आता जनतेत तीव्र नाराजी आणि संताप निर्माण करत आहे.

बीएसपीची मागणी :
शहरातील दोन्ही देशी दारू भट्ट्या त्वरित बंद करण्यात याव्यात.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात.
दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी.

जर प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा बीएसपीने दिला आहे.
शहरात वाढत्या व्यसनाधीनतेच्या विरोधात हा आवाज आता अधिक बुलंद होणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News