Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पुणे | स्वारगेट पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या शिष्टमंडळाची भेट; बनावट शासन निर्णय प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी

पुणे, ९ जुलै २०२५ — पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या शिष्टमंडळाने भेट देऊन ग्रामविकास विभागाशी संबंधित बनावट शासन निर्णय काढून कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आलेल्या गंभीर प्रकारावर आवाज उठवला. हा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात उघडकीस आला असून, शासनाची फसवणूक आणि सामान्य जनतेच्या पैशाचा अपहार असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे निवेदन देत सांगितले की, बनावट आदेशांच्या आधारे झालेली कंत्राटे रद्द करावीत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत. यावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही चिंता व्यक्त करत तातडीने कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पदाधिकारी विशाल तांबे, सचिन दोडके, सोपान (काका) चव्हाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाने सांगितले की, जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलन छेडले जाईल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News