Thursday, June 25, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुसमध्ये शिव सेनेचं महावितरणला निवेदन : वीज बिलातील व्याज कमी करण्याची आणि मीटर रीडिंगचा फोटो छापण्याची मागणी

घुग्घुस, चंद्रपूर | २६ जून २०२५ : घुग्घुस येथील महावितरण कार्यालयात आज शिवसेवा, घुग्घुस यांच्या वतीने नागरिकांच्या समस्या मांडत वीज बिलातील व्याज कमी करण्याची आणि मीटर रीडिंगचा फोटो थेट वीज बिलावर छापण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आलं.

निवेदनात नमूद करण्यात आलं की, अनेक नागरिक वेळेवर वीज बिल भरत असतानाही त्यांच्या बिलांमध्ये चक्री व्याजाचा समावेश केला जात आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच, मीटर रीडिंग चुकीचं घेतल्यामुळे अनेकदा बिल चुकीचं येतं. त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी मीटर रीडिंग घेतल्याचा फोटो वीज बिलावर छापणं गरजेचं आहे.

या वेळी बोलताना अमित बोरकर यांनी सांगितलं की, सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण लक्षात घेता वीज बिलातील व्याज कमी करणं आवश्यक आहे. मीटर रीडिंगचा फोटो छापल्यास गैरसमज टाळता येतील आणि महावितरण व ग्राहक यांच्यात विश्वास वाढेल. त्यांनी यासोबतच रात्रभर होणाऱ्या वीज खंडनाचाही मुद्दा उपस्थित करत, लहान मुलांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

पूर्व ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके यांनी सांगितलं की, घुग्घुस शहरात बेरोजगारीचं प्रमाण अधिक असून, MSEDCLच्या मनमानी बिलामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः निवृत्त कामगारांची परिस्थिती बिकट झाली असून, बिल भरण्यातच त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च होतो आणि उरलेले पैसे औषधोपचारावर खर्च होतात.

हे निवेदन कनिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय, घुग्घुस यांच्याकडे कारवाईसाठी सादर करण्यात आलं असून, याची प्रत कलेक्टर, चंद्रपूर; वरिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय, चंद्रपूर आणि ब्रीथ ऑफ लाईफ मल्टीपरपज सोसायटीचे अध्यक्ष व संस्थापक यांना देखील पाठवण्यात आली आहे.

या वेळी शिवसेना शहर अध्यक्ष बंटी गोरपडे, पूर्व ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके, अमित बोरकर, कांग्रेस ग्रामीण कांग्रेस कमिटी (SC) तालुका अध्यक्ष राजकुमार वर्मा, प्रणयकुमार बंडी आदी मान्यवर उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News