Saturday, April 18, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला – बचावकार्य सुरू

मावळ तालुका, पुणे – कुंडमळा (इंदुरी), ता. मावळ येथील इंद्रायणी नदीवर असलेला लोखंडी पूल 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडली. हा पूल इंदुरी आणि आसपासच्या गावांना जोडणारा महत्त्वाचा पूल होता.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), मित्र पोलिस, शिवदुर्ग संस्था, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांचे पथक घटनास्थळी उपस्थित असून तपास व शोधकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत नदीत वाहून गेलेल्या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर रात्रीपासूनच बचावकार्य सुरु असून पर्यायी पूल किंवा मार्गाबाबत प्रशासन विचार करत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

आपत्कालीन संपर्क क्रमांक:

टोल फ्री: 1077, विट्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 8975232955 और राहुल पोखरकर (आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक): 8888565317

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News