Saturday, April 18, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक विमानप्रवास; ISRO भेटीसाठी १२० विद्यार्थ्यांचे बंगळुरूला उड्डाण

गडचिरोली – राज्याच्या सर्वात दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली आणि गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळांमधील १२० विद्यार्थी आज नागपूरहून विमानाने बंगळुरू येथील इस्रो (ISRO) केंद्राच्या अभ्यासदौऱ्यावर रवाना झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री आमदार अशोक उईके, गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड हे मान्यवरही उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उपग्रह, रॉकेट, अवकाश तंत्रज्ञान याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना मिळावी यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली आहे. हे विद्यार्थी इस्रोच्या विविध प्रयोगशाळा, प्रदर्शन केंद्र आणि तंत्रज्ञान केंद्रांना भेट देणार आहेत.

गडचिरोलीसारख्या आर्थिकदृष्ट्या मागास आणि दहशतीच्या छायेत असलेल्या भागातील विद्यार्थ्यांना मिळालेली ही संधी त्यांच्यासाठी केवळ अभ्यासाची नव्हे, तर प्रेरणेची सुद्धा आहे. समाजकल्याण विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीन दिशा आणि स्वप्नांना गती मिळणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News