Monday, June 16, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बुद्ध पौर्णिमा निमित्त घुग्घुस येथे १५ वे भव्य आईसक्रीम वाटप कार्यक्रम संपन्न

घुग्घुस (चंद्रपुर): सोमवार, दिनांक १२ मे २०२५ रोजी संपूर्ण जगाला प्रज्ञा, करुणा आणि शांततेचा संदेश देणारे, “द लाईट ऑफ एशिया” महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या त्रिगुणी पावन पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त घुग्घुस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य आईसक्रीम वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर घुग्घुसचे ठाणेदार राऊत यांच्या हस्ते आईसक्रीम वाटपाचे उद्घाटन करण्यात आले. युथ सर्कल घुग्घुस, भीम टायगर सेना, अष्टविनायक बहुद्देशीय संस्था व मातोश्री वाचालयाच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे हे सलग १५ वे वर्ष होते.

कार्यक्रमाला घुग्घुस पोलिस विभाग, पत्रकार, स्थानिक नागरिक, बौद्ध उपासक व उपासिका, तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अष्टविनायक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रज्योत गोरघाटे, धीरज ढोके, विशाल कोल्हे, रितेश मोडक, सोनू घागरगुंडे, पुनम ढोके, अनुप कांबळे, सुमेध पाटील, अमित बोरकर, आशू नलबोगा, मंगेश नगराळे, विकी देठे, उमेश सातपुते, अमर टाकसांळे, चंद्रशेखर आभारे, आकाश धोटे, अक्षय कोवळे, राहुल कांबळे, प्रफुल उमरे, शुभम शेंडे आणि युथ वर्ग सहभागी झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महाकारुणिक बुद्धाच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News