यवतमाळ – राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त यवतमाळ येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले असून, या आंदोलनाचे नेतृत्व आमदार बाळासाहेब मांगूळकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि वसंत पुरके यांनी केले.
सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास व पंचायतीराज धोरणांविरोधात आवाज उठवण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी ग्रामपंचायतींच्या स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित करताना, सत्तेच्या केंद्रीकरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. आंदोलनात सरकारविरोधी घोषणाबाजी करत ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेवर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.