Sunday, April 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

सावली शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट – नगर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप

सावली, चंद्रपुर : सावली शहरात नगर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनधिकृत बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असून, शहराच्या मध्यवर्ती भागात परवानगीविना दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाबाळ पा. संगीडवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत नगर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शहरातील वार्ड क्रमांक ९ येथील मध्यवर्ती ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून सिमेंटच्या पक्या दुमजली इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या बांधकामासाठी आवश्यक ती कोणतीही परवानगी नगर पंचायतकडून घेण्यात आलेली नाही, असे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. यावरून प्रशासनाचा ढिसाळ कारभार व निष्काळजीपणा उघड झाला आहे.

संगीडवार यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात येणाऱ्या इमारतीमुळे नगर पंचायतीच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने वेळेवर कारवाई न केल्यामुळे शहरात बिनधास्त अनधिकृत बांधकामे वाढत असून हे सर्व स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच सुरू असल्याचा संशय बळावतो आहे.”

राजाबाळ संगीडवार यांनी याप्रकरणी उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला असून, प्रशासनाने जर यावर कारवाई केली नाही, तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सावली शहरात अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांचा पायंडा रोखण्यासाठी नगर प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा शहराचा विकास नियोजनशून्य आणि बेभरवशाचा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News