Sunday, April 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महा मिनरल मायनिंग कंपनीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; विवेक बोढे यांच्या प्रयत्नातून कुटुंबीयांना आर्थिक मदत

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : उसगाव येथील महा मिनरल मायनिंग बेनिफिकेशन प्रा. लि. कंपनीत कार्यरत सुरक्षा रक्षक विजय विठ्ठल माहुरे (वय ३५, रा. भोयगाव) यांचा ड्युटीवर असताना अचानक मृत्यू झाल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. बुधवारी, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना घुग्घुस येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर गावातील नागरिक व मृतकाचे कुटुंबीय रुग्णालयासमोर जमले. त्यांनी आर्थिक मदतीच्या मागणीसाठी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलन सुरू केले. संतप्त जमावाने योग्य मोबदला न मिळेपर्यंत मृतदेह न हलवण्याचा इशारा दिला.

घटनेची माहिती मिळताच भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे घटनास्थळी दाखल झाले आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना याबाबत माहिती दिली. आमदार भोंगळे यांनी तत्काळ कंपनी प्रशासनाला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले.

यानंतर विवेक बोढे यांच्या पुढाकाराने मृतकाच्या कुटुंबीय व कंपनी व्यवस्थापन यांच्यात बैठक घेण्यात आली. चर्चेनंतर कंपनीने मृतकाच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यास तसेच त्यांच्या पत्नीला दरमहा १५ हजार रुपये मानधनाची नोकरी देण्यास सहमती दर्शवली. या निर्णयानंतर संतप्त जमाव शांत झाला आणि परिसरातील तणाव निवळला.

या प्रकरणात विवेक बोढे यांच्या तत्परतेमुळे मृतकाच्या कुटुंबीयांना त्वरित मदत मिळाल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News