नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या राजनगर झोपडपट्टीतील सुमारे ३० अतिक्रमणांवर मंगळवारी नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागाने कारवाई केली. त्याच दिवशी दिघोरी येथील संघर्ष नगर भागातील अतिक्रमणांवरही धडक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई झोनचे उपायुक्त अशोक गराटे आणि प्रवर्तन विभागाचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत यांच्या नेतृत्वात पार पडली. महाविद्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.
महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करत झोपड्यांचे हटविले आणि परिसर मोकळा केला. अतिक्रमणामुळे परिसरात अस्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे स्थानिक नागरिकांनीही ही कारवाई स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले.




