Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

हिंगोली: देवदर्शनासाठी निघालेल्या बसला लागली अचानक आग, सुदैवाने जीवितहानी टळली

हिंगोली — कर्नाटक राज्यातील भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन निघालेल्या खासगी बसला आज सकाळी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात भीषण आग लागली. ही घटना वगरवाडी गावाजवळ औंढा–वसमत–परभणी राज्य महामार्गावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, बसने अचानक पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखत चालकाने बस थांबवली आणि सर्व भाविकांना वेळीच खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

सुदैवाने सर्व भाविक सुरक्षित असून मोठा अनर्थ टळल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News