घुग्घुस (चंद्रपुर): घुग्घुस येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रविवार, ६ एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या रामभक्तांना मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने शीतपेयाचे वितरण करण्यात आले.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन पार पडले. मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या भाविकांना उन्हाच्या तीव्रतेत दिलासा देण्यासाठी शीतपेय वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सभापती नितु चौधरी, भाजपाचे साजन गोहने, दिनेश बांगडे, चिन्नाजी नलभोगा, नितीन काळे, विवेक तिवार, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, प्रमोद भोस्कर, हेमंत कुमार, असगर खान, अनिल मंत्रिवार, सुनील राम, लक्ष्मी नलभोगा, शारदा गोडसेलवार, सुचिता लुटे, सुनीता घिवे, शंकर सिद्दम, गणेश राजूरकर, उमेश दडमल, सुनंदा लिहीतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




