Saturday, July 4, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणांचा निपटारा; ५७७ कोटींहून अधिक तडजोड शुल्क वसूल

पुणे : पुणे जिल्ह्यात २२ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अदालतीत वादपूर्व १ लाख २५५ आणि तडजोड पात्र ३८ हजार ५७० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोक अदालतीमध्ये विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश होता. त्यामध्ये बँकेच्या कर्जवसुलीचे ८ हजार ८१९, तडजोड पात्र फौजदारी खटले ३१ हजार ५३७, वीज देयक ३२९, कामगार विवाद १८, भूसंपादन प्रकरणे १११, मोटार अपघात दावा १६३, वैवाहिक विवाद ७४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट अंतर्गत १ हजार ९९४, इतर दिवाणी प्रकरणे ५१४, महसूल प्रकरणे ७ हजार ७३१, पाणी करासंबंधीचे ८४ हजार ८६०, ग्राहक वादविवाद २, तसेच इतर २ हजार ६७३ प्रकरणांचा समावेश होता.

५७७ कोटींहून अधिक तडजोड शुल्क वसूल

या लोक अदालतीत एकूण ५७७ कोटी ३९ लाख ११ हजार १५६ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. त्यापैकी प्रलंबित ९७ हजार ६४४ प्रकरणांपैकी ३८ हजार ५७० प्रकरणे निकाली काढून ३२० कोटी ६८ लाख १२ हजार ४०७ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तसेच वादपूर्व २ लाख ४२ हजार ९८७ दाव्यांपैकी १ लाख २५५ दावे निकाली काढून २५६ कोटी ७० लाख ९८ हजार ७४९ रुपये वसूल करण्यात आले.

पुणे जिल्ह्याची राष्ट्रीय लोक अदालतीत आघाडी

पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीत दावे निकाली काढण्याच्या बाबतीत आघाडी कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी न्यायालयीन अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News