Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आरोग्य सेवेत 680 पदांची भरती; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दंत व आयुर्वेद महाविद्यालये तसेच सलग्न नऊ रुग्णालयांमधील गट-ड संवर्गातील 680 पदांची सरळसेवेने भरती पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी त्यांनी नव्या कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेचे महत्त्व समजावून सांगत उत्कृष्ट सेवा देण्याच्या सूचना दिल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या गट-ड संवर्गातील या पदांची भरती जलद गतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमार्फत पारदर्शक प्रक्रियेद्वारे निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

एकूण 680 पदे भरली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो रुग्णालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय तसेच विविध सलग्नित रुग्णालयांमध्ये गट-ड संवर्गातील 680 पदे भरली गेली आहेत. यामध्ये –

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: 66 पदे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये: 344 पदे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय: 19 पदे

ग्रामीण आरोग्य केंद्र, सावनेर: 11 पदे

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: 57 पदे

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय: 135 पदे

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय: 22 पदे

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय: 3 पदे

शासकीय आयुर्वेद रुग्णालय: 23 पदे

रुग्णसेवेस बळकटी

नवीन नियुक्तींमुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल. गेल्या काही वर्षांपासून या पदांच्या रिक्ततेमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण होता. या भरतीमुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होईल, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि निवड समितीचे सदस्य सचिव डॉ. राज गजभिये यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नियुक्त उमेदवारांना शुभेच्छा देत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमात काही निवडलेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या भरतीमुळे शासकीय रुग्णालयांना आवश्यक असलेली मनुष्यबळाची उणीव भरून निघेल, तसेच नागरीकांना अधिक जलद आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News