घुग्घुस : दि.२३ मार्च २०२५ रोजी जनता ज्युनियर कॉलेज, घुग्घुस येथे प्रथमच २०००-२००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या खास सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोले सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खुटेमाटे सर, धोपटे सर, मासीरकर सर, पठाण सर, बोबडे सर, आसुटकर सर, बोबडे मॅडम आणि आसुटकर मॅडम उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह आणि रोपटे देऊन भव्य स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल शेंडे यांनी केले, तर प्रास्ताविक संजय बोबडे यांनी सादर केले. आभार प्रदर्शन माधुरी निखाडे आणि हितेश लोढे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ॲड. वीणा बोरकर, सीमा पप्पुलवार, मंगला झोडे, अर्पण रॉय, माधुरी निखाडे आणि ज्योती घुल्ले यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संजय बोबडे, हितेश लोढे, धनराज जुमनाके, धनराज झोडे, नितीन मंदाडे, प्रफुल शेंडे, महेश मुक्के, अमोल झाडे, सुनील निखाडे, सचिन निमजे, किशोर मंदाडे, नीरज डांगे, नरेंद्र बुचे, राजेंद्र कन्नाके आणि मुकेश मेश्राम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माजी विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा संस्मरणीय ठरला. जुन्या आठवणींना उजाळा देत, गुरूजनांचा सन्मान करत आणि परस्परांशी संवाद साधत या अनोख्या स्नेहसंमेलनाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.