Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुंबईत ‘ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव २०२५’ चे भव्य उद्घाटन

मुंबई : ‘ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव २०२५’ चं उद्घाटन आज आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे (IMO) महासचिव आर्सेनिओ डॉमनिग्झ आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबईतील पवई येथे पार पडले.

या सोहळ्याला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार सिन्हा, नौवहन विभागाचे महासंचालक श्याम जगन्नाथन आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मालिनी शंकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांनी ‘ग्रीन शिपिंग’च्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आयएमओ महासचिवांचा SCI मॅरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट

यावेळी IMO महासचिव आर्सेनिओ डॉमनिग्झ यांनी पवईतील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मॅरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ला भेट दिली. त्यांनी युवा नौकानयन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सागरी क्षेत्रातील हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले.

‘ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव २०२५’ हे भारताच्या सागरी क्षेत्रातील शाश्वत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत तज्ज्ञांनी या वेळी व्यक्त केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News