Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (शिंदे गट) तर्फे अन्नदान

घुग्घुस (चंद्रपूर) : जय बजरंग हनुमान मंदिर सेवा समिती, बहादे प्लॉट, वॉर्ड क्रमांक 2 येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 09 फेब्रुवारी 2025, रविवार रोजी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) घुग्घुस शहराध्यक्ष महेश डोंगे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी शिवसेना कार्यकर्ते आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये कुणाल टेकम, अभिषेक मडावी, रोहित आवडे, नितेश टेकाम, संतोष वागमारे, महेश वागमरे, नरेश एटे, शैलेश गाडगे, क्रिश टेकाम, श्रीधर रेड्डी, बाबा धांडे, मंगेश बोबडे, संकेत कमतवार आदी शिवसैनिकांचा समावेश होता.

याशिवाय कुंबी समाज, घुग्घुसचे सुधाकर बांदुरकर हे देखील विशेष उपस्थित होते.

या अन्नदानाच्या उपक्रमातून सामाजिक सेवा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. स्थानिक नागरिकांमध्ये या उपक्रमामुळे मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News