Sunday, June 21, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

‘महा आवास अभियान 2024-25’ पोस्टरचे प्रकाशन; 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप

मुंबई: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2’ अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच, 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान ‘महा आवास अभियान 2024-25’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले.

या पोस्टरमध्ये अभियान राबवण्याचा उद्देश, कालावधीत होणारे विविध उपक्रम तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्याची योजना यांची माहिती देण्यात आली आहे. या अभियानातून ग्रामीण भागातील नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध असून, ‘महा आवास अभियान 2024-25’ अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या कामांना गती दिली जाणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News