Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोलीतील लोखंडी उद्योगांमुळे विदर्भाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता – नितीन गडकरी

नागपूर : गडचिरोलीतील उच्च दर्जाच्या लोह खनिजावर आधारित प्रक्रिया उद्योग वेगाने उभे राहत असून, येत्या पाच वर्षांत हा प्रदेश देशातील स्टील हब म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरच्या अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित एडवांटेज विदर्भ या तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच विदर्भातील खासदार, लोकप्रतिनिधी आणि देशभरातील नामांकित उद्योजक उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, “गडचिरोलीमध्ये लॉयड्स मेटलसारख्या उद्योग समूहांनी गुंतवणूक केल्यामुळे येथील नक्षलवादाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. स्थानिक युवक रोजगाराच्या संधींमुळे मुख्य प्रवाहात येत आहेत, हे सकारात्मक परिवर्तन आहे.”

विदर्भाच्या विकासाबाबत गडकरी यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, नागपूर आणि अजनी येथील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 2400 कोटी रुपयांचा लॉजिस्टिक पार्क, कार्गो हब, मदर डेअरीचा प्रकल्प यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे विदर्भाचा विकास दुप्पटीने होईल, असे त्यांनी नमूद केले.

या औद्योगिक प्रदर्शनामुळे विदर्भातील गुंतवणुकीच्या संधी वाढण्यास मदत होणार असून, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News