Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मंत्रालयातील नियुक्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मंत्रालय तसेच मंत्री आस्थापनेवरील विशेष कार्यकारी अधिकारी आणि खाजगी सचिव यांच्या जवळपास १२५ नावांची यादी मान्यतेसाठी आली होती. त्यापैकी १०९ नावे त्यांनी मान्य केली असून उर्वरित नावे भ्रष्टाचाराचे आरोप किंवा चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली असल्याने त्यांना मान्यता नाकारली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे नागपुरात आयोजित प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

सौर ऊर्जेच्या दरांबाबतही स्पष्टीकरण

सौर ऊर्जेच्या वापराबाबत पसरत असलेल्या अफवांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. घरगुती सोलर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना किंवा पीएम सूर्य घर योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या वाढीव दरांचा फटका बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News