चंद्रपुर : १० जानेवारी रोजी मा.सा.कन्नमवार यांच्या १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच चंद्रपुरात येणार आहेत, यामुळे या कार्यक्रमाचे महत्व अधिक वाढले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नीटनेटके आणि सुव्यवस्थित असावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला उत्तम नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक पार पडली.
या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, श्री माता महाकाली महोत्सवाचे पदाधिकारी, कन्नमवार रोप्य महोत्सव समितीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.




