Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हा क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती : राज्याच्या क्रीडा धोरणानुसार सन 2022-23 व 2023-24 यावर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडूमध्ये महिला, पुरुष, दिव्यांग खेळाडूंकरीता आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आहे. क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी सतत दहा वर्षे मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले असावे. वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावी. गुणांकाकरीता जिल्ह्यातील खेळाडूची कामगिरी ग्राह्य धरल्या जाईल. मागील दहा वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य पदक विजेते, तसेच कनिष्ठ राष्ट्रीय, शालेय, ग्रामीण आणि महिला, खेलो इंडियामधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठगट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान 3 खेळाडू घडविणारा मार्गदर्शक संघटना अथवा वैयक्तिकरित्या सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडूचे विहीत नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगतपूर्व पाच वर्षातील राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ, कनिष्ठ शालेय राष्ट्रीय, शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी लक्षात घेवून उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन वर्षातील कामगिरीचा विचार करण्यात येईल. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक चपक, क्रिडा स्पर्धा आशियाई गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, सहभागी होणाऱ्यांना थेट पुरस्कार देण्यात येणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरित्या सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज सिलबंद लिफाफ्यात सादर करून त्यावर पुरस्काराचे नाव व वर्ष, अर्जदाराचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

पुरस्काराकरीता अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी त्यांची कामगिरी दि.1 जुलै ते 30 जुन याप्रमाणे गृहीत धरावी. तसेच प्रत्येकांनी अर्जासोबत राज्यात गेल्या 15 वर्षापासून सतत वास्तव असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सोबत जोडावे. एका जिल्ह्यामध्ये क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी अन्य जिल्ह्यात अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. जिल्हा क्रीडा पुरस्कार दोन व्यक्तींना विभागुण दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आढळुन न आल्यास पुरस्कार घोषित केला जाणार नाही. वेळापत्रकामध्ये परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे दि.15 जानेवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करता येतील. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News