प्रणयकुमार बंडी
चंद्रपूर : शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव किरण साली, प्रवक्ता राहुल लोंडे, युवासेना सचिव पूर्व विदर्भ सुभम नवले, तसेच कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर शैलेश केळझरकर यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या माजी भारतीय विद्यार्थी सेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले.
घुग्घुस शहर प्रमुख प्रभाकर कुम्मरी, रमेश कट्टेकोला, तसेच माजी उपशहर प्रमुख सुहास बारसागडे यांनी युवासेना (शिंदे गट) जिल्हा कार्यालयात पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी चेतन उजवणे, संदीप भोयर, कमलाकर कुळमेथे, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.




