Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

40 वर्षांनंतर वर्गमित्र आणि गुरुजनांसोबत पुन्हा एकदा शाळेची आठवणीतली उजळणी केली.

प्रणयकुमार बंडी
घुग्घुस (चंद्रपुर) : जनता विद्यालय, घुग्घुसच्या 1985 च्या दहावीच्या बॅचने 40 वर्षांनंतर वर्गमित्र आणि गुरुजनांसोबत पुन्हा एकदा शाळेची आठवणीतली उजळणी केली. 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हातारदेवी बायपास येथील त्रिमूर्ती लॉनमध्ये हा स्नेहसोहळा अतिशय उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. उपस्थित गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी व गुरुजनांमध्ये डॉ. राम बेंडेंवार, प्रा. शाम धोपटे, प्रा. राजुरकर गुरुजी, प्रा. खुटेमाटे गुरुजी, जोंधळे गुरुजी आणि अन्य मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संचालन देवानंद पाटील आणि सुरेश आवळे यांनी केले, तर प्रस्ताविक मंजुशा गावंडे व देशभ्रतार यांनी मार्मिक शब्दात मांडले.

वर्गमित्र आणि मित्रिणी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले. या निमित्ताने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. गुरुजनांनी शिष्यांच्या यशाचा गौरव केला, तर विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षण आणि अनुशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या स्नेहसोहळ्याने जुन्या स्मृतींना उजाळा देत सर्वांना नवीन उभारी व ऊर्जा दिली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News