Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आमदार संजय देरकर यांचा जन्मदिन निमित्त रुग्णांना फळ वाटप

घुग्घुस (चंद्रपूर): वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उबाठा) तर्फे एक खास उपक्रम राबविण्यात आला. आज, शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी, घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान, सरकारी रुग्णालयातील गैरसोयी लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत गैरसोयी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमाला घुग्घुस शिवसेना (उबाठा) अध्यक्ष बंटी घोरपडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख हेमराज बावने, ज्येष्ठ नेते प्रभाकर चिकनकर, वरिष्ठ नेते बाळू चिकनकर, अजय जोगी, चेतन बोबडे, गणेश शेंडे, महेश लट्टा, योगेश भांदककर, रघुनाथ धोंगडे, गणेश उईके, मारोती जुमनाके, वेदप्रकाश मेहता, गजानन बांदुरकर, अमित बोरकर, आणि इतर शिवसैनिक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जोपासत आणि लोकहितासाठी घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News