Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस येथे सरकारी रुग्णालयाचे ठप्प काम लवकर सुरू करण्याची मागणी – अमित बोरकर

घुग्घुस (चंद्रपुर) : शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी आम आदमी पार्टीचे घुग्घुस माजी शहर अध्यक्ष व नवयुवक बौद्ध मंडळाचे अध्यक्ष अमित बोरकर यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी घुग्घुस येथील सरकारी रुग्णालयाचे मागील २-३ वर्षांपासून ठप्प असलेले काम लवकरात लवकर सुरू करून सामान्य जनतेसाठी रुग्णालयाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

घुग्घुस परिसरात सध्या MRI, CT स्कॅन, रक्त तपासणी यांसारख्या मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांना छोट्या छोट्या आजारांसाठी चंद्रपूरला जावे लागते, ज्यामुळे वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. याशिवाय, या भागात रुग्णवाहिका सेवाही निष्क्रिय असल्याने रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

अमित बोरकर यांनी नमूद केले की, योग्य वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांनी प्राण गमावले आहेत. या त्रासदायक परिस्थितीत बदल करण्यासाठी, त्यांनी आमदारांना लवकरात लवकर रुग्णालयाचे काम पूर्ण करून ते जनतेसाठी खुले करण्याची विनंती केली.

समाजातील आरोग्यसुविधांची गरज ओळखून या मागणीला तातडीने प्रतिसाद देण्याची अपेक्षा आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News