मांडवगड (बेडा) : मौजा मांडवगड (बेडा) शिवारात दारूबंदी विशेष मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेत कच्चा मोहा सडवा आणि गावठी दारू जप्त करून 5,72,000/- रुपये किंमतीचा अवैध साठा नष्ट करण्यात आला.सदर कार्यवाहीत सारीका पवार, अल्कना पवार, करीना काळे, लिना पवार वर गुन्हे दाखल करण्यात आले.
कार्यवाहीत सहभागी अधिकारी व कर्मचारी परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस व ठाणेदार, पोलीस स्टेशन सेवाग्राम यांच्या नेतृत्वाखाली स.फौ. मारोती कातकर, विठ्ठल दुधकोहळे, पो. हवा. हरिदास काकड, नितीन राजपूत, सचिन सोनटक्के, मंगेश झामरे, कारभारी घुगे, मनोज लोहकरे, किशोर पेटकुले, नापोशि. गजानन कठाणे, संजय लाडे, पो.शि. वैभव चरडे, रामेश्वर नागरे, गुणवंत सुरकार, मपोहवा वृंदा टाके.
दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून अवैध दारू निर्मितीचे मुळे उखडण्याचा दृढ संकल्प पोलीस प्रशासनाने दाखवला आहे. ही कार्यवाही पुढील काळातही सातत्याने सुरू राहील.




