सेवाग्राम : दारुबंदी कायद्यान्वये दारूची अवैध विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूच्या शिश्या, रोख रक्कम, आणि दोन जुने मोपेड वाहन जप्त केले. एकूण मालमत्तेची किंमत ₹1,14,290/- आहे. सुभाष कलसे, पोर्णीमा कलसे (दोन्ही राहणार आलोडी, वर्धा), अनिकेत शेखर गजभिये (राहणार सावजी नगर, कारला रोड, वर्धा) वर गुन्हा नोंदवले. ही कारवाई दारूबंदी कायदा लागू करण्याच्या दिशेने महत्वाची पावले ठरली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराज जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर आणि परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस यांच्या निर्देशाने करण्यात आली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी हरिदास काकड, सचिन सोनटक्के, मंगेश झामरे, गजानन कठाणे, वैभव चरडे आणि प्रियंका मोहर्ले यांनी सहभाग घेतला.




