Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुक असावे – निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे

अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात संपन्न

बुलढाणा : शासन अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित असून या योजनाचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील सर्व नागरिकांना होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी अल्पसंख्याकांनी शिक्षणाचे महत्व समजून स्वत:च्या हक्क रक्षणासाठी जागरुक असले पाहिजे. अल्पसंख्याकांच्या सर्वागिण विकासासाठी प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री ठाकरे यांनी आज येथे केले.

संयुक्त राज्य संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला होता. त्याकरीता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरीता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्याक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कौस्तुभ हिवाळे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक ज्योती हिवाळे, इंटरनॅशलन ह्युमन राईट कमिशनचे राज्याध्यक्ष एस.पी.हिवाळे, सामाजिक कार्यकर्त अरविंद सैतवाल, समुदायातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात डॉ. जयश्री ठाकरे म्हणाल्या की, सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून मुख्य प्रवाहात सामिल होतील त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. तसेच शासनाव्दारे अल्पसंख्याकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करुन त्यांच्या विकासासाठी राबवित असलेल्या योजना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचेल याकरीता प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सहभागी वक्त्यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासनाने तयार केलेल्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमाचा वापर करुन प्रशासनाने तसेच अल्पसंख्याक समुदायातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावे. तसेच अल्पसंख्याकांनी आपले अधिकार जाणून आपला विकास व देशाप्रती कर्तव्य पुर्ण करावेत, असे मत मांडले.

उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थांनी देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्व, घटनात्मक अधिकाराबाबत विद्यार्थ्यांनी भाषन केले. यावेळी विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र सोभागे यांनी केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News