घुग्घुस (चंद्रपूर) : यवतमाळ, वणी नगरपरिषदेच्या माजी नगर सेवक तथा वणी महिला काँग्रेस शहराध्यक्षा श्यामा सतीश तोटावार यांनी शनिवार दिनांक 14.09.2024 रोजी घुग्घुस येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन पूजा व आरती केली. सर्व प्रभागांच्या अध्यक्षांनी श्यामा सतीश तोटावार यांचे मनापासून स्वागत करून आनंद व्यक्त केला.
श्यामा सतीश तोटावार यांनी घुग्घुस येथील नवयुवक गणेश मंडळ, सुभाष नगर घुग्घुस., मार्केट लाईन स्थित घुग्घुसचा राजा गणेश मंडळ, घुग्घुस का सदिच्छा येथे भेट दिली. यावेळी श्यामा सतीश तोटावार यांच्यासोबत किरण पुरेल्ली होती. नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष चिरंजीवी ताल्लपेली व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी मयूर कलवल, विशाल दामेर, सागर गेडाम, रवी गड्डीवार, गौरव दुर्गम, अजय कुलमुते, आकाश निब्रड, दिनेश बांगडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
श्यामा सतीश तोटावार यांनी घुग्घुस गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली.
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com