घुग्घुस (चंद्रपुर) : शहरातील बँक ऑफ इंडिया जवळील वेकोलिच्या जुन्या लोखंडी पुलाची शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंग व भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी व्यापारी बांधवासह पाहाणी केली.
वेकोलिचा लोखंडी पुल रेल्वे प्रशासनाने २९ मे पासून दुचाकीच्या रहदारी करिता बंद केला. घुग्घुस वस्ती व वेकोलि वसाहतीला जोडणारा हा लोखंडी पुल आहे. या पुलावरून वेकोलि वसाहतीत राहणारे नागरिक दुचाकीने घुग्घुस वस्तीकडे ये-जा करीत होते. तसेच घुग्घुस वस्तीचे नागरिक या पुलावरून वेकोलि वसाहतीकडे ये-जा करायचे घुग्घुस वस्तीत मोठी बाजार पेठ आहे. हा पुल बंद केल्याने घुग्घुस वस्तीतील व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळपास ३० वर्षे जुना हा वेकोलिचा लोखंडी पुल आहे हा पुल जीर्ण झाल्याने रहदारी करिता बंद करण्यात आला आहे.
वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, व्यापारी मंडळाचे अनिल गुप्ता, सन्नी खारकर, दिनेश बांगडे, आकाश निभ्रड, विवेक तिवारी, सतीश बोन्डे, उप क्षेत्रीय प्रबंधक सुधाकर रेड्डी, आस्तिक गौरकार, पांडुरंग थेरे, प्रवीण बनपूरकर, सोनू पाटील, अनिल यादव, अमित सिंह, छोटेलाल वर्मा,दीपक नंदवानी, हरीश मदान, रोहन बरादिया, गोकुळ तुरणकर, दीपक अनेजा, मुबारक शेख, जंगलू मांडवकर, अमोल पुरटकर, ब्रिजेश टेलर,धनाजी चव्हाण, यांनी संयुक्तरित्या वेकोलिच्या लोखंडी पुलाची पाहाणी केली.




