जिवती (चंद्रपुर) : तालुक्यापासून अवघ्या ४ कि.मी अंतरावर असलेल्या दमपूरमोहदा येथील तरूण शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १०.३० च्या दरम्यान चर्चेत आली. अप्पाराव मुन्ना पवार (४२) असे तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत्यक अप्पाराव यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. शेती हेच त्यांच्याकडे एकमेव साधन होते मात्र वर्षानुवर्षे शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने चिंता वाढले होते. यंदाही पिक परिस्थिती पाहिजे तसी नाही. आणि भरघोस उत्पादन मिळण्याची शास्वती दिसत नाही त्यामुळे या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.
मृत्यक तरूण शेतकरी मागिल काही दिवसांपासून अस्वस्थ दिसत होता. नेहमीप्रमाणे तो आजही शेतात गेला होता परंतु शेतात कुणिच नसल्याने त्याने विष प्राशन केले आणि शेजारच्या शेतात माकडे पळविण्यासाठी गेलेल्या मोठी वहिनीला जोरात आवाज दिला. तेव्हा मोठी वहिनी त्याच्याकडे पळत आली तोपर्यंत दिर अप्पाराव विष प्राशन करून बेशुद्ध अवस्थेत पडून होते. आरडाओरड केल्यानंतर नातलग व शेजारी गोळा झाले व तातडीने त्याला उपचारासाठी त्यांना जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गढचांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व दोन्ही मुली आहेत.




