वर्धा : दि.13/09/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे अशोक नगर वर्धा येथे बेलाबाई महिंद्र राखडे हिचे राहते घरी दारू बंदी बाबत प्रो.रेड केला असता, यातील तिचे साथीदारासह तिचे राहते घराचे स्लॅबवर मोहा दारूची भट्टी लावुन मोहा दारू निर्मीती करीत असतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आले. जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातुन 15 लोखंडी व प्लास्टीक ड्रममध्ये अंदाजे 2,500 ली, मोहा सड़वा रसायण कि 2,00,000 रु, 04 प्लास्टीक डबक्यांमध्ये अंदाजे 60 ली, गावठी मोहा दारू कि 9,000 रू. व इतर भट्टी साहित्यासह जु.कि. 2,27,900 रू.चा मुद्देमाल जप्त केला. बेलाबाई महिंद्र राखडे, वय 30 वर्ष, रा.अशोक नगर वर्धा आणि मनोज नत्थुजी पैठे, वय 40 वर्ष, रा.पुलफैल लाला लजपतराव शाळाजवळ वर्धा यांचेवर पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि.वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पो.अं.मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.