Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अपघातात वडील जागीच ठार; तर मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू

ब्रह्मपुरी : दुचाकीने जाणाऱ्या बापलेकाला पीकअपने जोरधार धडक मारली. यात वडील जागीच ठार झाले. तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना ब्रह्मपुरीपासून दहा किमी अंतरावर असलेल्या खरकाडा फाटा येथे शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. उमेश गणपत ठाकरे (३२) रा. खरकाडा असे मृत वडिलाचे तर वैभव उमेश ठाकरे (४) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. परंतु मुलाला एका खाजगी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान हा अपघात बघतानाच सोमेश्वर गजानन ठाकरे (४२) याला एका दुचाकीने धडक दिल्याने तोसुद्धा जखमी झाला आहे. घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस अधिकारी करत आहेत. दोघांच्या मृत्यू मुळे खरकडा गावात शोककळा पसरली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News