Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तालुकास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये राजलक्ष्मी इंटरनॅशनल च्या विद्यार्थ्यांचे यश

तालुका स्तरीय शालेय बुद्धीबळ व फुटबॉल स्पर्धेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा दणदणीत विजय.

देऊळगाव राजा : नुकत्याच तालुका पातळीवर शालेय स्पर्धा सुरू झाल्या असून जे खेळाडू आहेत त्यांना आपल्या कलेची चुणूक दाखवण्याची शासनाने संधी उपलब्ध करून दिली आहेत, नुकतीच बुद्धिबळ तालुका क्रीडा स्पर्धा श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा येथे पार पडली, या स्पर्धेमध्ये देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनलचे विद्यार्थी शिवम सोनुने, विनायक मगर,यश सावंत या विद्यार्थ्यांची शालांत जिल्हा बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

 तसेच 14 वर्षाखालील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सहकार विद्या मंदिर आणि राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल यांच्यातील सामना शाळेत खेळला गेला. अंतिम फेरीत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ने 2-1 ने सामना जिंकला असून. बुलढाणा जिल्हा येथे खेळल्या जाणाऱ्या जिल्हा स्तरिय सामन्यासाठी संघ पात्र ठरलां आहे. संघ, प्रशिक्षक आणि स्पोर्ट स्टाफचे अभिनंदन करत आहे. यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा डाॅ.मिनल शेळके तसेच सचिव डाॅ.रामप्रसादजी शेळके यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सुजित गुप्ता, सी.इ.ओ, प्राचार्या डॉ.प्रियंका देशमुख उपप्राचार्य फैजल उस्मानी, शारीरिक शिक्षक वसीम सिद्धिकी, राजेश खांडेभराड, बाळासाहेब गोजरे, राजेश पंडित, प्रशासन प्रमुख पंढरी भुतेकर व शिक्षेकेत्तर, शिक्षकवृंद उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News