Sunday, July 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अवयदान! तुम्ही वाचू शकता एखाद्या रुग्णाचे प्राण

रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती

चंद्रपूर : शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत समाजसेवा विभागाद्वारे भारतीय अवयवदान दिनानिमित्त आज (दि.3) रॅली काढण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी ‘अवयदान! श्रेष्ठदान….तुम्ही वाचवू शकता एखाद्याचे प्राण’ अशा घोषणा नागरिकांमध्ये जनजागृती केली.

सदर रॅलीला अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव सुमित जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ.मिलिंद देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे उपस्थित होते. सदर रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर-जटपुरा गेट-हॉटेल सेलिब्रेशन-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर, रामनगर अशी मार्गक्रमण केल्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली समारोपीय कार्यक्रम पार पडला.

भारतीय जनतेमध्ये अवयवदानाबददल जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या आदेशान्वये 11 जुलै ते 3 ऑगष्ट 2024 या कालावधीत विविध स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्लोगन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविन्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रुढी, प्रथा, परंपरांना आडकाठी देउन मोठ्या प्रमाणात अवयवदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव सुमित जोशी यांनी अवयवदानाबाबत असलेले गैरसमज सोडून प्रत्येकाने अवयवदान करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे यांनी अवयवदान काळाची गरज असून प्रत्येकाने अवयवदानास संमती देण्याचे आवाहन केले. संचालन समाजसेवा अधिक्षक राकेश शेंडे आणि हंमत भोयर यांनी तर आभार समाजसेवा अधिक्षक उमेश आडे यांनी मानले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.निवृत्ती जीवने, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.कुलेश चांदेकर, सर्जरी विभागाच्या विभागप्रमुख डॉ.दिपा जहांगिरदार, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.सुनिल भैसारे, वधिरिकरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.बूले, जीवरसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.रजनी तोरे, शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ट्युटर रिना कन्नाके उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अवयवदान शपथ घेऊन करण्यात आली.

सदर रॅलीमध्ये या शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय परिचर्या महाविद्यालय, विमलादेवी आयुर्वेदीक महाविद्यालय, पुरुषोत्तम बागला होमिओपॅथी कॉलेज, सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालय, एफ.ई.एस. गॅर्ल्स कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News