Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 163 लागू

चंद्रपूर : महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही चंद्रपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये (जुना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144) आदेश लागू करण्यात आले आहे.

या आदेशान्वये 25 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. तसेच या कालावधीत नियमित व रोजच्या वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बूथ, पेजर, मोबाईल फोन, इमेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांना लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

ही आहेत परीक्षा केंद्र :
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा चंद्रपूर शहरातील 10 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. यात विद्याविहार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तुकुम, सरदार पटेल कॉलेज गंज वार्ड, बीजेएम कॉर्मेल अकादमी तुकुम, रफी अहमद किडवई हायस्कूल घुटकाळा, सेंट मायकल इंग्लिश स्कूल नगीना बाग, बजाज पॉलीटेक्निक बालाजी वार्ड, माउंट कार्मेल कॉमेंट हायस्कूल शास्त्रीनगर मुल रोड, मातोश्री विद्यालय ताडोबा रोड तुकुम, चांदा पब्लिक स्कूल दाताळा रोड रामनगर, आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मुल रोड चंद्रपूर येथे होणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News