चंद्रपूर : जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत शिक्षकेत्तर सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन दरमहा वेळेत होण्यासाठी शासनाने महा आयटी मार्फत सेवानिवृत्ती वेतन संगणक प्रणाली विकसित करून त्यामधील 72 रकाण्यातील माहिती भरून मागितलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शिक्षकेत्तर कर्मचारी निवृत्ती वेतनधारक, ज्या पंचायत समिती कार्यालयात निवृत्तीवेतन घेत आहेत त्या ठिकाणी जाऊन 72 रकाण्यातील माहिती तात्काळ भरून देण्यास सहकार्य करावे. जेणेकरुन आपले निवृत्ती वेतन दरमहा नियमित वेळेत करता येईल. याकरीता जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सर्व शिक्षकेत्तर सेवानिवृत्त कर्मचा-यांनी माहिती सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
जि.प.चंद्रपूर अंतर्गत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे निवृत्ती वेतनाकरीता माहिती सादर करण्याचे आवाहन
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




