Sunday, July 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ

कोरपना (चंद्रपुर) : श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच स्थानांतरण झाले असून आता शहरातील जुन्या आय.टी.आय समोर जनसेवेचे नवे अध्याय लिहण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. स्थानिक भाजपाचे जेष्ठ नेते रमेश पा. मालेकर, महेश शर्मा, कुंडलीक उलमाले, शंकर चिंतलवार व अन्य उपस्थित जेष्ठ पदाधिकारी-कार्यकर्त्यांसमवेत सेवा केंद्राचे फीत कापून शुभारंभ पार पडले.

याठिकाणी कोरपना तालुका व परिसरातील नागरिकांना सर्व शासकीय योजनांची निःशुल्क माहीती व मदत मिळणार असून प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण ही करण्यावर आमचा भर असेल. हे कार्यालय नुसतेच कार्यालय नसून लोकसेवेचे दालन आहे. गोरगरीब बांधवांच्या हाकेला ओ देण्यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सेवाभावी प्रेरणेतून याठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सेवेत राहील. यासोबतच राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांपैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, अन्नपुर्णा गॅस योजना, जेष्ठ नागरिकांना तिर्थ दर्शन व वयोश्री योजना इ. योजना व त्यांचे विहीत अर्ज आणि लाभही या सेवा केंद्राच्या माध्यमातून स्थानिकांना मिळवता येतील, अशी माहिती दिली.

यावेळी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, सतिश उपलेंचवार, अमोल आसेकर, अरूण मडावी, अरूण डोहे, संजय मुसळे, पुरुषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, शशिकांत आडकिणे, महेश घरोटे, विजय रणदिवे, कार्तिक गोण्लावार, ज्योतीराम कोयचाळे, दिनेश खडसे, अनंता येरणे, विनोद नरेन्दुलवार, प्रमोद पायघन, सुधाकर ताजणे, मिननाथ पेटकर, ओम पवार, नैनैश आत्राम, मनोज तुमराम, सागर धुर्वे, अजीम बेग, मारोती कोरांगे, रमेश कोमलवार, खुशाल वराटे, विनोद बट्टलवार, विलास पारखी, विजय बोबडे, बंडू बोढे, दिनेश ढेंगळे, परशुराम मुसळे, वर्षा लांडगे, इंदिरा कोल्हे, शोभा आगलावे, लक्ष्मी कुडमेथे, अनिता किन्नाके, प्रमोद कोडापे, जगदीश पिंपळकर, रवी बंडीवार, साजीत उमरे यांचेसह अनेकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News