घुग्घुस बंद या रॅली ला वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांचे पाठिंबा देण्यात आले.
घुग्घुस (चंद्रपुर) : बहुजन समाज पार्टी, नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती, बौद्ध सर्कल समिती, आम्रपाली बुद्ध विहार, वंचित बहुजन आघाडी, आदिवासी श्री भिवसन देवस्थान व माता मंदिर बहुउद्देशीय सेवा मंडळ, नवएकता जयसेवा बहुउद्देशीय समिती, आपतर्फे बुधवार, 21 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमीलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला १ ऑगस्ट रोजीचा संविधानविरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याकरिता घुग्घुस कडकडीत बंद करण्यात आले होते. या बंदला व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्या.
सकाळी ११ वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतड्या जवळून दुचाकी रॅली काढण्यात आली. यासाठी बसपाचे माजी जिल्हा महासचिव भिमेंद्र कांबळे यांनी पुढाकार घेतला. घुग्घुस-चंद्रपूर, घुग्घुस-म्हातारदेवी, घुग्घुस-वस्ती मार्गे मार्गक्रमण करीत व्यापारी प्रतिष्ठान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतड्या जवळ रॅलीचे समापन करण्यात आले. याठिकाणी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तसेच पोलिस ठाण्यात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळेस बसपाचे माजी जिल्हा महासचिव भिमेंद्र कांबळे, नवबौध्द स्मारक समितीचे बंडू रामटेके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव नागेश पथाडे, आम्रपाली बुद्ध विहाराच्या अध्यक्षा सखुबाई ठमके, सुजित सोनटक्के, बबलू सातपुते, शाम कुम्मरवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शरद पाईकराव, आदिवासी श्री भिवसन देवस्थान व माता मंदिर बहुद्देशीय सेवा मंडळाचे गणेश उईके, मारोती जुमनाके, नवएकता जयसेवा समितीचे अध्यक्ष गणेश किन्नाके, आपचे अध्यक्ष अमित बोरकर, दीपक पेंदोर, अल्का चुनारकर, दुर्गा पाटील, जगन्नाथ परागे, प्रियांका धुपे, विलास सिडाम, उषा आगदारी, वनिता निहाल, उर्मिला लिहीतकर, योगिता मुन, सरोज पाझारे, पुनम कांबळे संदीप वासेकर, केलास पाटील, चंद्रगुप्त घागरगुंडे, अमृत सोदरी, सुनील, पाटील, अमित मानकर, प्रदीप वासेकर, बालाजी पटांगे, अभिषेक मजगावडी व मोठया संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.