घुग्घुस : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत घुग्घुस येथील केमिकल नगर वार्डातील प्रयास सभागृहात देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून व विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरात मेडिसिन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ यांच्यातर्फे रक्तदाब, शुगर, ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान, नाक, घश्याचे आजार, खाज, त्वचेचे विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात तब्बल ६११३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. 864 रुग्णांची निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 1271 रुग्णांना निःशुल्क चष्मा दिला जाणार आहे. औषधीचे वाटप करण्यात आले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
घुग्घुस व पोंभुर्णा येथील महाआरोग्य शिबिराचे हे सलग ९ वे वर्ष आहे तर राजुरा शहरात पहिल्यांदाच भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. संचालन साजन गोहने यांनी तर आभार प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी मानले.
यावेळी माजी जि.प.सभापती नितु चौधरी, भाजपाचे अमोल थेरे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, संतोष नुने, गणेश कुटेमाटे, राजेश मोरपाका, रत्नेश सिंग, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, सुनील बाम, सुरेंद्र भोंगळे, रवी चुने, गौरव ठाकरे, नितीन काळे, सचिन कोंडावार, विनोद जंजर्ला, हेमंत कुमार, पुजा दुर्गम, सुचिता लुटे, नंदा कांबळे, मल्लेश बल्ला, अमीना बेगम, सुनीता पाटील, सतीश बोन्डे, बबलू सातपुते, विवेक तिवारी, संकेत बोढे, आकाश लोहकरे, सुनील राम, अतुल चोखांद्रे, मारोती मांढरे, प्रवीण सोदारी, शंकर सिद्दम, श्रीकांत सावे, विल्सन आंबट, रोहित जैस्वाल, सुरेंद्र जोगी, गोविंद घोडके, विजय पचारे, वंदना नागवंशी, राखी डांगे, सुनीता घिवे, नाजमा कुरेशी, कुसुम सातपुते, लक्ष्मी नलभोगा, सुरेखा डाखरे, माधुरी पेटकर मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.