पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी गोळप येथे उद्घाटन
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 1 मेगा व्हॅट क्षमतेच्या मौजे गोळप येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उद्या 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी दिली.
या प्रसंगी खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार योगेश कदम, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, गोळप सरपंच रफिका तांडेल आदी उपस्थित राहणार आहेत.




