स्थानिक गुन्हे शाखेची कार्रवाही
बल्लारपूर (चंद्रपूर) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर येथून देसी कट्टा, 7 जिवंत काडतूस व एक खाली केस कमरेत बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली.
जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध रित्या हत्यार बाळगणाऱ्यांवर माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. सदर मोहिमेदरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा बल्लारपूर येथील भगतसिंग वार्डामधील डब्लुसिएल ग्राउंडवर एक इसम आपले कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे. सदर माहितीवरून पोउपनि. भुरले त्यांच्या टिमसह तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता, सदर इसमाच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पँटच्या खिशात देशी कट्यात वापरण्यात येणारे ०७ नग जीवंत काडतुस व एक नग खाली केस मिळून आले. यावरून रोहीत निषाद, वय 24 वर्ष, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर, जि.चंद्रपुर विरूद्ध पोस्टे बल्लारपूर येथे अवैधरित्या शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद केला असून सदर इसमास पुढिल तपासकामी पोस्टे बल्लारपूर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. दिपक डोंगरे, सतिश अवथरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, गणेश भोयर यांनी केली आहे.