देऊळगांव राजा : शहरातील माळीपूरा येथील रहिवासी व नगर परिषद देऊळगांव राजा येथे कार्यरत कर्मचारी सुरेश बाबुराव शिंगणे वय ५६ वर्ष यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दि ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मूले, सुना, नातवंडे, पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
सकाळी शहरामधील त्यांच्या मोठया बहिणीचे अंत्यसंस्कार अटोपल्या नंतर त्यांच्या छातीमधे अचानक दुःखायला लागले त्यांना दवाखाण्यात नेले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.