Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तहसील मध्ये महसूल पंधरवडा साजरा करताना जनतेनी सहभागी व्हा : तहसिलदार वाघमारे

चंद्रपूर : जिल्ह्यातील नाग भीड तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व महसुली ठिकाणी पंधरवडा शुभारंभ १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट आयोजित करण्यात आला असून शासनाच्या धोरणानुसार वेगवेगळी कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून जनतेनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन तहसिलदार वाघमारे यांनी केले.

नाग भीड येथील तहसील कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दीन साजरा करून पंधरवडा शुभारंभ केला जाईल आणि मुख्यमंत्री, माझी लाडकी बहिण योजना मंजूर करण्यात आलेल्या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, ४ ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, ५ ऑगस्ट रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, ६ ऑगस्ट रोजी शेती, पाऊस आणि दाखले वाटप कार्यक्रम, ७ ऑगस्ट रोजी युवा संवाद शिबिर, ८ ऑगस्ट रोजी महसूल जन संवाद, ९ ऑगस्ट रोजी महसूल ई प्रणाली पद्धती १० ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, ११ ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, १२ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, दिव्यागाच्या कल्याणचा, १३ ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण १४ ऑगस्ट रोजी महसूल पंधर वाडा वार्तालाप १५ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी संवाद शिबिर आणि उकृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण पंधर वाडा सांगता समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात येणार असल्याचे तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी एका सभेदरम्यान आयोजित करून जनतेनी सहभागी करा असे आवाहन तहसिलदार वाघमारे यांनी मंडळ अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांना केले असून सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News