काँग्रेस तर्फे वारकऱ्यांचे स्वागत व चहा – पाणी
घुग्घूस : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त समस्त गावकरी मंडळी व तेली समाज बहुउद्देशीय संस्था घुग्घूस यांच्या वतीने गांधी चौकशी घुग्घूस येथून दिनांक 17 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता वारी विदर्भाची काशी तीर्थक्षेत्र वढा करीता भजन मंडळ टाळ मृदूंग व विठ्ठल नामाच्या गजरात निघाली. सदर वारीचे काँग्रेस कार्यालया समोर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व वारकऱ्या करीता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोहित डाकूर, सुनील पाटील, कपिल गोगला,थामस अर्नाकोडा, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.