चंद्रपुर : राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने काही शहर आणि गावांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही साथीचे आजार पसरू नयेत या साठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
काय करावे आणि काय करु नये
सजग राहा
अफवाकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका.
आपत्कालीन परिस्थितीसाठी एस एम एस.चा उपयोग करा आपले मोबाईल फोन चार्ज करुन ठेवा.
हवामानातील बदलाच्या अद्ययावत माहितीसाठी रेडिओ ऐका, टीव्ही पहात रहा, वर्तमानपत्रे वाचत रहा.
गुरेढोरे, पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करुन घ्या.
सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा.
आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वॉटर प्रूफ) बॅगमध्ये ठेवा.
जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जायचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या.
सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करा.
पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा.
पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरुक रहावे.
काळजी घ्या –
पूर प्रवाहात प्रवेश करू नका.
सीवरेज लाइन, गटारे, नाले, पुल, नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा.
विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा.
ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरिकेड्स) सह चिन्हांकित करा.
पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोनफूट उंच वाहणारे पूर पाणी मोठ्या मोटारींनाही वाहून नेऊ शकते.
ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. अन्न झाकून ठेवा.
उकळलेले / क्लोरीनयुक्त पाणी प्या.
आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकांचा वापर करा.
पाणी ओसरल्यावर –
मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका.
कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका. वापरण्यापूर्वी तपासणी करा.
सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.
तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वास्तूपासून सावध रहा.
पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका.
मलेरियापासून बचाव करण्यासाठी डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा.